05Nov
Event Rajgad Deepotsav
अविस्मरणीय अनुभव… राजगड दीपोत्सव! 🪔 एकच प्रण… स्वराज्याच्या राजांच्या चरणी पहिला दिवा अर्पण करून संपूर्ण स्वराज्य दीपमय करण्याचा! ✨ सरहद लॉ स्कूल, पुणे यांचा राजगड दीपोत्सवातील पहिलाच अनुभव! राजगडाच्या पवित्र भूमीवर इतिहास अनुभवताना अभिमानाने ऊर भरून आला. प्रत्येक दिव्यासोबत शिवरायांच्या स्वराज्याची प्रेरणा मनामनात उजळली. मा. मयूर मसूरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवलेला हा सोहळा म्हणजे एकता, शिस्त, संस्कार आणि शिवविचारांचा सुंदर संगम! काही अनुभव फक्त अनुभवायचे असतात… कारण ते शब्दांत नाही, तर मनात कायमचे कोरले जातात! ❤️ पहिला राजगड दीपोत्सव… पण आठवणी आयुष्यभराच्या! 🚩 जय जिजाऊ! जय शिवराय! जय स्वराज्य!